दापोली शहरातील फॅमिली माळ येथून इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर मासूम इलियास शेख यांचा सुमारे ४ लाख ४८ हजाराचा ऐवज अज्ञाताने लंपास केला

दापोली शहरातील फॅमिली माळ येथून इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर मासूम इलियास शेख (२८) यार्चा सुमारे ४ लाख ४८ हजाराचा ऐवज अज्ञाताने लंपास केल्याची घटना २६ जुलै रोजी सकाळी ८.३०च्या सुमारास उघडकीस आली.पोलिसांच्या माहितीनुसार, मासूम शेखने २५ जुलै रोजी रात्री ८.३०च्या सुमारास घराजवळील सोसायटीच्या पार्किंगमध्ये आपली चारचाकी गाडी रेनॉल्ट डस्टर (MH 0४ ७२७३) ही लावून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी २६ रोजी ८.३०च्या दरम्यान कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी सोसायटी पार्किंगमध्ये येऊन पाहिले असता तेथील चारचाकी गाडी नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर शेखने फॅमिली माळ व दापोली परिसरात शोध घेतला असता गाडी कुठेही आढळली नाही. आपली गाडी कोणीतरी अज्ञाताने परवानगीशिवाय चोरून नेल्याचे शेखच्या लक्षात आले. गाडीची किंमत ३ लाख ५० हजार तसेच ५० हजार रु. किंमतीचे २ केवीए बजाज कंपनीचे जनरेटर, २२ हजार रु. किंमतीची केबल कटर मशीन, १३,०००रु. किंमतीचे स्टील कटरमशीन, ७,०००रु. किंमतीचे ड्रिल मशीन २नग, ६ हजार रु. किंमतीचे ड्रिल हॅमर मशीन असा सुमारे ४ लाख ४८ हजाराचा ऐवज अज्ञाताने चोरल्याची फिर्याद शेख यांनी दापोली पोलिसात दाखल केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button