नूतनीकरण झालेली लोकमान्य टिळक जन्मभूमी उदघाटनाच्या प्रतिक्षेत…पुण्यतिथी दिनी तरी जनतेला लोकार्पण होणार का…..ॲ‍ड. धनंजय जगन्नाथ भावे-9422052

लोकमान्य टिळक जन्मभूमीची झालेली दुरावस्था पाहून सर्वप्रथम फेब्रुवारी 2017 मध्ये मा. ना. देवेंद्रजीना पहिले पत्र लिहिले. त्यानंतर सन 2020 पासून सातत्त्याने सोशल मिडियावर आणि वृत्तपत्रातून टिळक जन्मभूमीची दुरावस्था जनतेसमोर मांडली आणि शासनाकडे काय म्हणतात तो पाठपुरावाही केला. दैनिक सकाळ, दैनिक तरूण भारत तसेच प्रहार डिजीटल यांनी टिळक जन्मभूमीची दुरावस्था जनतेसमोर मांडली. मंत्री आले गेले पण कोणीही लक्ष दिलेले नव्हते. डॉ. तेजस गर्ग यांनाही ईमेलवर माहिती पाठविली आणि लक्ष देण्याची विनंती केली सन 22 मध्ये माझी मुख्यमंत्रीमहोदयांकडील विनंती पुढील कार्यवाहीसाठी सांस्कृतिक कार्य आणि पर्यटन मंत्रालयाकडे पाठविण्यात आलेली आहे असे उत्तरही मिळाले होते. प्रतिवर्षी टिळक पुण्यतिथीला उपस्थितांच्या लवकरच टिळक जन्मभूमीचे नूतनीकरण होणार अशा घोषणा होतच होत्या. आमचे मित्र नितिन लिमये तर प्रत्येक 1 ऑगस्टला भेटून सांगत होते साहेबांकडे विषय बोललो आहे यावर्षीच कामाला सुरुवात होईल. पण शेवटी एकदा गेल्यावर्षी मुहुर्त मिळाला आणि पालकमंत्री आणि वरील सर्व विनंती स्वीकारणारे यांच्याकडील निवेदनाला यश आले आणि थेट लोकमान्य टिळक जन्मभूमीसह परिसर विकासाचाच शुभारंभ झाला. गेल्याच वर्षी पावसाळ्यापुर्वी हे काम होणार अशी घोषणा होती पण काम सोपे नव्हते हे मान्य करावेच लागेल आणि त्यामुळे खरे तर यावर्षीच्या मे महिन्यातच टिळक जन्मभूमीच्या नूतनीकरणाचे बहुतांशी काम पूर्णही झाले आणि जन्मभूमी बंद असूनही हजारो पर्यटकांनी टिळक जन्मभूमीचे दर्शन बाहेरूनही घेतले. अपेक्षा आहे की निदान 1 ऑगस्ट रोजी टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने नूतनीकरण झालेल्या लोकमान्य टिळक जन्मभूमीचे लोकार्पण होईल. पण नूतनीकरणासाठी प्रयत्न करणा-या पालकमंत्रीमहोदयांचे आणि त्यासाठी पाठपुरावा करणा-या ज्ञात-अज्ञात व्यक्तिंचे आणि शक्तींचे आणि ज्यांनी गेली 5-6 वर्षे लोकमान्यांच्या पुण्यतिथी दिनांच्या दिवशी टिळक जन्मभूमीच्या नूतनीकरणासाठी विशेष पाठपुरावा केला त्या सर्वांचे जाहीर आभार…..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button