
महायुतीमध्ये जर भाजप जर 288 जागा लढणार तर महायुती कशाला आहे ? “-नरेश म्हस्के
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. महायुती असो महाविकास आघाडी दोन्ही ठिकाणी जागावाटपावरून दावे – प्रतिदावे सुरू झाले आहे. भाजपचे नेते माजी मंत्री खासदार नारायण राणेंनी जागावाटपावरून एक खळबळजनक विधान केलं.त्यावर आता शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते खासदार नरेश म्हस्केंनी प्रतिप्रश्न उपस्थित केला आहे,राणेंना प्रत्युत्तर देताना नरेश म्हस्के म्हणाले,’भाजप 288 जागा लढणार’ या भाजप नेते नारायण राणेंच्या विधानावर भाष्य करताना नरेश म्हस्के म्हणाले, ” नारायण राणे साहेब ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी त्यांचे मत मांडलेल आहे. हे भारतीय जनता पार्टी पक्षाचं मत नाही. हे मत माननीय नड्डा साहेबांचे मत नाही. हे मत माननीय अमित शहा साहेबांचं नाही. हे मत माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाही. महायुतीमध्ये जर भाजप जर 288 जागा लढणार तर महायुती कशाला आहे ? ” असा सवाल देखील नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला.प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाच्या ताकदीनुसार जागा मिळतील. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय अजित दादा पवार मिळून यासंबंधी निर्णय घेतील आणि भारतीय जनता पक्षाची ज्येष्ठ नेते यावर निर्णय घेतील.” असं म्हणत अप्रत्यक्षरीत्या नारायण राणेंना जोरदार प्रत्युत्तर खासदार नरेश म्हस्केंनी दिलं आहे.