अखेर चिपळूण नगर परिषदेत थम्ब मशीन कार्यान्वित

अधिकारी, कर्मचार्‍यांनी वेळेत कार्यालयात यावे यासाठी आता शुक्रवारपासून नगर परिषदेने थम्ब मशिन कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे १४६ अधिकारी, कर्मचार्‍यांना यावर थम्ब द्यावा लागणार आहे. यावर फोटोही स्कॅन होत आहे.शहरातील नागरिकांची कामे करण्यासाठी नगर परिषदेत अधिकारी, कमचारी मिळून १४६ जण आहेत. यातील काहीजण वेळेत येवून कामे करीत असले तरी काहीजण मनाला वाटेल तेव्हा येवून जात असल्याचे नवे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या लक्षात आले. त्यामुळे काही दिवसांपूर्वी अशा कर्मचार्‍यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले होते. याचवेळी थम्ब मशिन लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यानुसार शुक्रवारपासून नगर परिषदेच्या स्वागत कक्षाजवळ हे मशिन बसवण्यात आले आहे. येथे थम्ब करताना संबंधित अधिकारी, कर्मचारी यांचा फोटोही स्कॅन होत आहे. सध्या आस्थापनातील कायमस्वरूपी कर्मचार्‍यांसाठी हे मशिन कार्यान्वित करणेत आले असले तरी नजिकच्या काळात ठेकेदारी पद्धतीवरील कर्मचार्‍यांसाठीही मशिन बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button