जिल्हाधिकाऱ्यांकडून तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर
रत्नागिरी, दि.25 (जिमाका) : जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनच्या सर्व खात्यामधील कार्यालयांकरिता शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टया व्यतिरिक्त 3 सार्वजनिक सुट्टया जाहीर करण्याच्या अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहे. या अधिकारांचा वापर करुन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी सन 2024 या वर्षासाठी गुरुवार 12 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन, मंगळवार 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आणि गुरुवार 31 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी हे तीन दिवस स्थानिक सुट्ट्यांचे दिवस म्हणून जाहीर केले आहेत.*000