
दोन हाणा, पण मला बाजीराव म्हणा’ अशी उद्धव ठाकरेंची अवस्था- आमदार प्रसाद लाड
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाची घोषणा करावी, अशी मागणी केली.त्यासोबतच शरद पवार आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण ज्याला मुख्यमंत्री करतील त्याला मी पाठिंबा देईन, असेही ते म्हणाले. दरम्यान, ठाकरे यांनी केलेल्या मागणीनंतर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरेंच्या मागणीवरून ‘दोन हाणा, पण मला बाजीराव म्हणा’ अशी उद्धव ठाकरेंची अवस्था झाली असल्याचे म्हटले आहे.प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, “वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या रुपाने असंख्य शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या मातोश्रीचे महत्त्व कमी करण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी किती लाचारी करायची? याची परिसीमा त्यांनी ओलांडली आहे” असा आरोप देखील त्यांनी केला.