
विधानसभा निवडणुकीत कोकणात कॉंग्रेसच्या विजयाचा झेंडा फडकवला पाहिजे- नाना पटोले
कोकण हा कॉंग्रेस विचारांचा आहे. आजही कोकणात अनेक ग्रामपंचायती कॉंग्रेसच्या आहेत. जनतेच्या मनात कॉंग्रेस आहे पण त्यांच्यापर्यंत नेत्यांनी गेले पाहिजे. गुंडगिरी किंवा धनशक्तीला जनता भीक घालत नाही. कॉंग्रेसला त्याचा फरक पडत नाही. आत्मविश्वासाने काम करा. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस महाविकास आघाडीला जनतेने भरघोस विजय मिळवून दिला आहे. आता विधानसभा निवडणुकीसाठी कोकणातील पक्ष संघटना मजबूत करा, यावेळी विधानसभा निवडणुकीत कोकणात कॉंग्रेसच्या विजयाचा झेंडा फडकवला पाहिजे असेही ते म्हणाले. www.konkantoday.com