उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विडंबन, स्टॅन्डअप कॉमेडियनकुणाल कामरा याच्या सेटची तोडफोड, शिवसैनिकांचा अंधेरीच्या हॉटेलात राडा


स्टॅन्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबन करणारे गाणे तयार केल्याने त्याच्या अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सेटची ४० ते ५० शिवसैनिकांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे.कुणाल कामरा याच्या गाण्याचा व्हिडीओ नुकताच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांवर शेअर केला होता. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा दिला होता.त्यानंतर काही मिनिटांनी हा हल्ला झाला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणावर कुणाल कामरा नेहमीच आपल्या नर्म विनोदी शैलीत टीप्पणी करीत असतात. शिवसेनेतून बाहेर आली. राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून बाहेर आली. हा प्रकाराने सर्वच कन्फूज झाले. हा प्रकार एकाने सुरु केला होता, असे गाण्याचे बोल आहेत. त्याच पुढे ‘ठाणे की रिक्षा, चेहरे पर दाढी, ऑखो पे चष्मा हाये..….मेरी नजर से दोखो तो गद्दार नजर आये….हाय आहे…असे एकनाथ शिंदे यांची टींगल केल्याने शिवसेना आक्रमक झाली होती.

मुरजी पटले यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणात अंधेरीच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात कुणाल कामरा याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तोडफोडी वेळी स्टुडिओत प्रेक्षक होते. त्यांना आधी बाहेर काढण्यात आले त्यानंतर सेटची तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात येते. स्वत: च्या प्रसिद्धीच्या हव्यासाठी अशा प्रकारे आमच्या नेत्याची बदनामी आम्ही खपवून घेणार नाही असे वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले होते. त्यानंतर काही वेळात हा हल्ला झाला आहे. या प्रकरणात आता पुढील कारवाई काय होणार याकडे लक्ष लागले आहे.

कुणालने गायलेले गाणे..
ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी,
आँखो पे चष्मा, हाये…
एक झलक दिखलाये
कभी गुवाहाटी मे छुप जाये
मेरी नजर से तुम देखो
तो गद्दार नजर वो आये…
ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी,
आँखो पे चष्मा, हाये…
मंत्री नहीं वो दलबदलू है…
और कहा क्या जाये?
जिस थाली में खाये
उसमेही छेड कर जाये
मंत्रालय से ज्यादा
फडणवीस के गोदी में मिल जाए
तीर कमान मिला है इसको
बाप मेरा ये चाहे
ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी,
आँखो पे चष्मा, हाये…

गद्दारांच्या चौर्यकर्माचीही कुणाल कामराने चांगलीच टर उडवली. घराणेशाही बोलून दुसऱयाचा बाप चोरला. यावर काय बोलणार! उद्या मी सचिन तेंडुलकरच्या मुलाला भेटेन आणि त्याला लंचचे निमंत्रण देईन. अर्धा तास तेंडुलकरची प्रशंसा करेन. नंतर आजपासून तेंडुलकर माझा बाप आहे असे म्हणेन. हे चालेल का, असा सवाल कुणालने केला आता या विषयावरून नवीन वादातून फुटले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button