
रत्नागिरी नगर परिषदेच्या सत्तारुढ पक्षाचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांनी खड्ड्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब
रत्नागिरी शहरवासिय जनतेच्या भावना लक्षात घेवून सत्तारुढ पक्षाचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांनी आज रत्नागिरी नगरपरिषदेवर जावून मुख्याधिकारी रत्नागिरी नगरपरिषद यांना जाब विचारला. यावेळी त्यांनी खड्डे भरताना ते जांभा दगडाने न भरता खडीने बुजवा. त्यासाठी अधिक मनुष्यबळ वाढवा पण लोकांना सुरळीत रस्ता करुन द्या. रत्नागिरीतील नागरिकांना रस्त्यावरुन वाहने चालविताना अडथळा होत आहे. याची जाणीव करुन देण्यासाठी आम्ही आलो आहोत. त्यामुळे लवकरात लवकर दिलासा द्यावा. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी निधी मोठ्या प्रमाणात दिला आहे. त्याचा वापर करा. माजी उपनगराध्यक्ष राजन शेट्ये यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. राजन शेट्ये यांनी मुख्याधिकारी यांच्या अडचणी समजून घेतल्या. शेवटी नगरपालिका आणि नागरिक यांच्यात चांगला समन्वय घडवून आणण्याची जबाबदारी आम्ही यशस्वी पार पाडू, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला