
गो-ग्रीन योजनेमध्ये कोकणातील १ लाख १३ हजार ग्राहकांचा सहभाग.
वीजबिलासाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ईमेल व एसएमएसचा पर्याय निवडणार्या लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांनी महावितरणच्या गो ग्रीन योजनेमध्ये ५ लाखांचा टप्पा गाठला आहे. या योजनेत सोमवार दि. ३० पर्यंत कोकण १ लाख १३ हजार २५४ ग्राहक समाविष्ट झाले आहेत.वार्षिक १२० रुपयांचा फायदा महावितरणकडून पर्यावरणपूरक गो ग्रीन योजनेतून वीज बिलासाठी छापील कागदाचा वापर कमी करण्यावर भर देण्यात आला आहे.
कागदी बिलाऐवजी फक्त ईमेल व एसएमएसचा पर्याय निवडल्यास प्रतिबिल १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांचा वीजबिलामध्ये वार्षिक १२० रुपयांचा आर्थिक फायदा होत आहे. विशेष म्हणजे गो ग्रीन योजनेचा पर्याय निवडल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या पहिल्याच वीजबिलामध्ये पुढील १२ महिन्यांची म्हणजे १२० रुपयांची सवलत एकरकमी देण्यात येत आहे. पूर्वी ही सवलत प्रत्येकी १० रुपये प्रत्येक बिलामध्ये मिळत होती.www.konkantoday.com