मागील काळात हत्तीरोगाचा केंद्रबिंदू ठरलेल्या मालवण तालुक्यात दहा वर्षांनी पुन्हा एकदा हत्ती रोगाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ

मागील काळात हत्तीरोगाचा केंद्रबिंदू ठरलेल्या मालवण तालुक्यात पुन्हा एकदा हत्ती रोगाचा पॉझिटिव्ह रुग्ण गेल्या महिन्यात सापडल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.सन 2014 मध्ये या जिल्ह्यात हत्तीरोगाचा शेवटचा रुग्ण सापडला होता. दहा वर्षांनी पुन्हा हत्तीरोगाचा रुग्ण सापडल्यामुळे गेला महिनाभर आरोग्य यंत्रणा त्या परिसरातील नागरिकांचे तपासणीसाठी रक्त नमुने गोळा करत आहे. 1238 रक्त नमुने या तपासणीसाठी गोळा झाले असून पुणे एनव्हीआय प्रयोगशाळे कडे रवाना झाले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात याचा अहवाल प्राप्त होईल. सद्या हत्ती बाधित रुग्ण आरोग्य विभागाच्या निगराणीखाली आहे. तर आरोग्य विभागाची पथके दिवस रात्र कार्यरत झाली आहेत.दरम्यान जिल्हाधिकारी किशोर तावडे यानी यासंदर्भात आरोग्य विभागाची बैठक बोलावली होती. या रोगाबाबत आरोग्य विभागाने त्या ठिकाणी केलेले सर्वेक्षण, गोळा केलेले रक्त नमुने याचा आढावा घेऊन हत्ती रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी, साथ रोग नियंत्रणअधिकारी डॉक्टर संदेश कांबळे आधी या बैठकीला उपस्थित होते.हत्तीरोग बाधित रुग्णाला क्युलेक्स जातीच्या डासाने चावा घेतला व तो डास इतरांना चावला तर त्याच्या माध्यमातून हत्ती रोगाचा फायदा होतो. या जिल्ह्यात म्हणजे मालवण तालुक्यात 2014 पर्यंत 71 रुग्ण सापडले होते. केंद्र शासन राज्य सरकार व जिल्हा आरोग्य यंत्रणा यांनी त्यावेळी एक चळवळ राबवून या रोगावर पूर्णतः नियंत्रण मिळविले होते. सन 2014 नंतर या जिल्ह्यात एकही रुग्ण सापडला नव्हता. आता हा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे या जिल्ह्यात हत्तीरोगाने शिरकाव केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सर्वेक्षण व औषध उपचाराचे काम विद्या पातळीवर हाती घेण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button