गुरुवर्य अच्युतराव पटवर्धन सेवावृत्ती पुरस्कार पुणे येथील विज्ञान आश्रम संस्थेला

भारत शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात येणारा गुरूवर्य अच्युतराव पटवर्धन सेवावृत्ती पुरस्कार यावेळी पाबळ पुणे येथील विज्ञान आश्रम या संस्थेला देण्यात आला.
याशिवाय भारत शिक्षण मंडळाच्या वतीने निरनिराळे पुरस्कार जाहीर करण्यात आले. आहेत गुरुवर्य शंकरराव पटवर्धन आदर्श शिक्षक पुरस्कार पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक मिलिंद कदम यांना जाहीर करण्यात आला आहे. भूषण गवाणकर यांना आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार ,राजेंद्र कांबळे यांना युनायटेड उद्योग पुरस्कार प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ प्राजक्ता कदम व बालवाडी शिक्षिका सौ अपर्णा गोगटे व बालवाडी सेविका वैष्णवी पावसकर यांनाही पुरस्कार जाहीर झाले असल्याची माहिती संस्थेचे कार्यवाह सुनील वणजु यांनी दिली. या पुरस्काराचे वितरण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार साळवी व कार्याध्यक्ष दिनकर पटवर्धन आदींच्या उपस्थितीत पार पडला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button