
गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण अवघ्या काही मिनिटातच हाऊसफुल्ल चाकरमान्यांचा हिरमोड
गणेशोत्सवात कोकण मार्गावरून धावणार्या गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण अवघ्या काही मिनिटातच हाऊसफुल्ल झाल्याने चाकरमान्यांचा हिरमोड झाला आहे. मागच्या पुढच्या तारखांची तिकिटे काढताना रिग्रेटचा संदेश झळकल्याने चाकरमान्यांची कोंडी झाली आहे. तिकिट आरक्षणात गैरप्रकार झाल्याचा संशयही प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे प्रतीक्षा यादीवरील गणेशभक्तांच्या नजरा खिळल्या आहेत. www.konkantoday.com