खड्ड्यांना वैतागलेल्या रत्नागिरीकरानी हे काय केले पहा!
रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यापासून बहुतेक भागातील सर्व रस्ते खड्डेमय झाले आहेत त्यातून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या बारीक खडीमुळे दुचाकी वरून प्रवास करणे म्हणजे अपघातात निमंत्रण ठरत आहे रस्त्यांवरील खड्डे याबाबत नागरिकांची तीव्र भावना आहे मात्र नगरपरिषदेचे प्रशासन ढिम्म आहे पाऊस कमी झाला की खड्ड्यात चिरे व तुकडे भरण्याचे काम नगर परिषदेने सुरू केले आहे मात्र जोरात पाऊस आला की हे भरलेले खड्डे पूर्ववत होत आहेत नगर परिषदेच्या या उपक्रमामुळे रत्नागिरीच्या रस्त्याला पूर्वीच्या खेड्यातील रस्त्यांप्रमाणे मातीच्या रस्त्याचे स्वरूप येत आहेत या रस्त्यावरील खड्ड्याच्या निषेधार्थ नागरिक आपल्या भावनांना मोकळी वाट करून देत आहेत काल आठवडा बाजार रोडवरील रिक्षा स्टॅन्ड जवळ पडलेल्या खड्ड्यात नागरिकांनी उस्फूर्तपणे वृक्षारोपण करून आपला निषेध व्यक्त केला याचा परिणाम होईल की नाही माहित नाही मात्र शहरातील प्रत्येक नागरिकांनी असे रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला तर रत्नागिरी शहर वृक्षारोपणात राज्यात प्रथम येईल यात कोणतीही शंका नाही