
संकल्प कलामंच रत्नागिरी,भारतीय नाविक सेना युनियन मुंबई आणि टी.डब्ल्यू.जे.कंपनी प्रा.लि.यांच्या संयुक्त विद्यमाने मान्यवरांचा सत्कार
_गुरुपौर्णिमा या पवित्र दिवसाचे औचित्य साधत संकल्प कलामंच रत्नागिरी,भारतीय नाविक सेना युनियन मुंबई आणि टी.डब्ल्यू.जे.कंपनी प्रा.लि.यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी मध्ये सामाजिक क्षेत्रात वावरत असताना सामाजिक जाणिव ठेवून आपण समाजाचे काही तरी देणं लागतो याचे भान ठेवून विविध क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणाऱ्या अनेक संस्था व व्यक्तीमत्व शोधून त्यांना गौरविण्यात आले.यामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था,साहीत्यिक,डाॕक्टर,लेखक ,कवि,पत्रकार,उद्योजक,कलाकार,खेळाडू,कीर्तनकार इत्यादी अनेकांना गौरविण्यात आले.असाच सत्कार यमुनाबाई खेर ट्रस्ट संचलित सर्वोदय छात्रालय रत्नागिरी नुकतेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करून ७५ री साजरी केली.आणि गेली ७५ वर्ष अविरतपणे सेवा देत खेड्यापाड्यातून आलेलेहजारो विद्यार्थी येथे राहुन स्वतःच्या पायावर उभे राहून उच्च पदावर गेले आहेत.या सर्व बाबींचा विचार करून संकल्प कलामंच व इत्तर संस्थांच्या वतीने गौरविण्यात आले.यावेळी व्यासपिठावर संकल्प कलामंचचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री.विनोद वायंगणकर,संस्थेचे सल्लागार व साहीत्यिक व हरहुन्नरी व्यक्तीमत्व डाॕ.दिलीप पाखरे,कार्यक्रमाचे अध्यक्ष अनेक नाट्यपुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक आणि सिरियल आभिनेते श्री.वामन जोग साहेब,सह्याद्री वृत्तवाहीनी निवेदिका सौ.भक्ती सावंत बोरकर,यमुनाबाई खेर ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री.संदीप ढवळ,व्यवस्थापकीय संचालक श्री.पांडुरंग पेठे,संचालक श्री.बाळकृष्ण शेलार,माजी विद्यार्थी श्री.रघुविर शेलार हे उपस्थित होते.