
निरोगी आणि दीर्घायुष्य हवे असेल तर लोकांनी आपल्या आहारामध्ये ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश करावा -आहारतज्ज्ञांचा सल्ला
जगात दरवर्षी होणाऱ्या पाच पैकी एक मृत्यू म्हणजेच २० टक्के मृत्यू हे चुकीच्या आहाराच्या सवयी मुळे होत. असतात निरोगी आणि दीर्घायुष्य हवे असेल तर लोकांनी आपल्या आहारामध्ये ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश करावा असा सल्ला आहार तज्ज्ञांनी दिला आहे. आहार तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीप्रमाणे योग्य आहारामुळे ज्याप्रमाणे लहान मुलांची योग्य प्रमाणात चांगली वाढ होते.
त्याचप्रमाणे तरुणांमध्ये हृदयविकार मधुमेह आणि स्थूलपणा या विकारांना ही लांब ठेवता येते अमेरिकेतील आकडेवारी प्रमाणे २ते १९ वयोगटातील २० टक्के लोकसंख्या तर वीस पेक्षा जास्त वय असणाऱ्या ४० टक्के लोकसंख्याला सध्या स्थूलपणाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. स्थूलपणामुळे टाइप २ डायबिटीस आणि कर्करोगाचा धोकाही वाढत असतो.
लॅन्सेट या आरोग्यविषयक आघाडीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या माहितीप्रमाणे १९९०ते २०१७ या कालावधीमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासाप्रमाणे तब्बल २० टक्के मृत्यू हे चुकीच्या आहाराच्या सवयी मुळे झालेले आहेत. लॅन्सेट मासिकातर्फे जगभरातील 195 देशांमध्ये या बाबतचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष समोर आला आहे.
लोकांनी आपल्या दररोजच्या आहारामध्ये ५० टक्के भाग फळ आणि भाज्यांमध्ये आणि उर्वरित भाग प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स मध्ये विभागीत केला तर त्यांना योग्य आहार मिळू शकतो असा सल्ला या अभ्यासात देण्यात आला आहे. दररोजची भूक ५० टक्के प्रमाणात फक्त फळं आणि भाज्या यांच्या माध्यमातूनच भागली पाहिजे असा सल्ला आहार तज्ञांनी दिला आहे.
www.konkantoday.com