रत्नागिरीतील खड्ड्या विरोधात श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे 24 जुलै चे ठिय्या आंदोलन तूर्त स्थगित
रत्नागिरी शहर खड्डे मुक्त करण्याच्या मागणीसाठी श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या वतीने रत्नागिरी नगर परिषदे समोर बुधवार दिनांक 24 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेले ठिय्या आंदोलन मुख्याधिकाऱ्यांनी पावसाची उघडीप मिळतात खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात येईल असे वृत्तपत्रातून आश्वासन दिल्याने वरील आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे मात्र शहरात काही ठिकाणी जांभ्या दगडाचा आणि काही खडीचा वापर करून खड्डे भरण्याचे काम सुरू आहे मात्र पावसामुळे सदरील खड्डे पुन्हा उकरले जाऊन शहरातील रस्ते चिखलमय होत आहेत नगरपरिषदेने जांभ्या दगडाने खड्डे न भरता पावसाळी डांबराचा वापर करून खड्डे भरावेत अन्यथा ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय पुन्हा जाहीर करण्यात येईल असा इशारा कट्ट्याचे मुख्य संयोजक श्री सुरेश लिमये आणि सचिव समाज भूषण श्री सुरेंद्र Ghude यांनी दिला आहे रत्नागिरी शहरातील नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन नगरपरिषदेने शहरातील रस्ते चांगल्या प्रकारे खड्डे मुक्त करावेत असे आवाहन कट्ट्या तर्फे करण्यात आले आहे