14 वर्षीय मुलीवर बलात्कार! दोघांनी चित्रीकरण करून व्हिडिओ इंस्टाग्राम वर केला व्हायरल!!

_माथेरानमधील एका हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीबरोबर एक अत्यंत घृणास्पद अशी घटना घडली आहे. १२ जुलै रोजी आपल्या तीन मित्र-मैत्रिणींबरोबर फिरायला गेलेल्या या अल्पवयीन मुलीवर एका मुलाने बलात्कार केला आहे. तर उर्वरित दोघांनी या घटनेचे चित्रिकरण करुन ते सोशल मीडियावर प्रसारित केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.ज्या दोघांनी बलात्काराच्या घटनेचे चित्रिकरण करुन ते प्रसारित केले, त्यापैकी एक असलेल्या २२ वर्षीय युवकाला गेल्या शुक्रवारी (१९ जुलै) पोलिसांनी अटक केली आहे. चित्रिकरण करणारी त्यांची सहकारी मैत्रिण आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा प्रमुख आरोपी अद्याप फरार असून त्या दोघांचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जुलै रोजी या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या एका मैत्रिणीने बहाण्याने माथेरानमधील या हॉटेलमध्ये आणले होते. या घटनेतील चारही जण परस्परांना चांगले ओळखत असून ते एकाच परिसरात राहणारे आहेत.घटनेतील पीडित मुलीने आपण एका मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणून दोन दिवसांसाठी बाहेर जात असल्याचे आपल्या पालकांना सांगितले होते. या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, माथेरानमधील हॉटेलमध्ये त्या दोन मुलांपैकी एकाने तिच्यावर बलात्कार केला. उर्वरित दोघांनी या घटनेचे चित्रिकरण केले. विशेष म्हणजे चित्रिकरण करण्यामध्ये तिच्याच जवळच्या मैत्रिणीचाही समावेश असल्याचा दावा या पीडित मुलीने केला आहे. चित्रिकरण करण्यात आलेला हा व्हिडीओ समाज माध्यमांवर १४ जुलै रोजी प्रसारित करण्यात आला.या मुलीच्या नातेवाईकांनी इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ पाहिल्यावर त्यांनी पीडित मुलीच्या पालकांना याबाबतची माहिती दिली. याबाबत पीडित मुलीकडे तिच्या पालकांनी विचारणा केली असता तिने या घटनेचा खुलासा केला. आपल्यावर माथेरानमध्ये बलात्कार झाला असून घाबरल्यामुळे याबाबत कुणाशी काहीही बोलले नाही, असेही तिने आपल्या पालकांना सांगितले. त्यानंतर या मुलीच्या आईने शुक्रवारी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर, पोलिसांनी या तीन आरोपींपैकी एकाला अटक केली. यातील मुख्य आरोपी हा घाटकोपरचा रहिवासी असून अद्यापही फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पीडित मुलीच्या मैत्रिणीलाही या खटल्यामध्ये आरोपी ठरवण्यात आले आहे.www.konkantoday com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button