
जमीन खचण्याचा प्रकार रोखण्यासाठी मिरजोळेतील संरक्षक भिंतीचा प्रस्ताव बासनात
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील नदीकिनारी जमीन खचण्याचा प्रकार सातत्याने सुरू आहे. मुसळधार पावसामुळे काही भागात भेगाही पडल्या असून तो भाग अधिक खचण्याची शक्यता आहे. गावातील काही शेतकर्यांनी तेथे भात लावणीही केली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी संरक्षक भिंतीचा प्रस्ताव केला आहे. परंतु अजूनही त्याला निधी मंजूर झालेला नाही.पंधरा वर्षापूर्वी मिरजोळे येथील नदीकिनारी भाग खचण्यास सुरूवात झाली. त्यानंतर दरवर्षी थोडा थोडा भाग खचतच होता. पावसाचा जोर वाढला की तेथील जमीन खचू लागते. आतापर्यंत बर्याच शेतकर्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. www.konkantoday.com