मायक्रोसॉफ्टचा सर्वर बंद! कोणत्या ॲप्स आणि सेवांना बसला फटका? ही यादी पाहा!!

मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने जगभरातील युजर्सना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जगभरात बँकांपासून विमान वाहतुकीपर्यंतच्या सेवा ठप्प झाल्या आहेत.जगभरातील अनेक वापरकर्त्यांच्या विंडो सिस्टिमवर निळ्या रंगाची स्क्रीन दिसत आहे. या स्क्रीनवर सांगण्यात येत आहे की, तुमचा संगणक अडचणीत आहे आणि रीस्टार्ट करणे आवश्यक आहे. युजर्सच्या कॉम्प्युटर आणि लॅपटॉपवर अचानक ब्लू स्क्रीन दिसू लागल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. युजर्सला अनेक समस्येचा सामना करावा लागत आहे.भारतीय वेळेनुसार दुपारी साधारण १२.३० दरम्यान मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर ठप्प झाला. मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात निर्माण झालेली ही समस्या Azure बॅकएंड वर्कलोड्सच्या कॉन्फिगरेशनमध्ये बदल केल्यामुळे झाली, ज्यामुळे स्टोरेज आणि कॉम्प्युटर रिसोर्सेसमध्ये अडथळे निर्माण झाले. CrowdStrike ने या प्रकरणाची दखल घेत समस्येची चौकशी सुरू केली आहे.मायक्रोसॉफ्ट विंडोजमधील या समस्येचा प्रभाव कंपनीच्या अनेक सर्व्हिसेसवर पडला आहे. युजर्सना मायक्रोसॉफ्ट 360, मायक्रोसॉफ्ट विंडोज, मायक्रोसॉफ्ट टीम्स, मायक्रोसॉफ्ट Azure, मायक्रोसॉफ्ट स्टोर आणि मायक्रोसॉफ्ट क्लाउड-पावर्ड सर्व्हिसमध्ये समस्यांचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी क्लाउड सेवा विस्कळीत झाल्यामुळे जगभरातील अनेक भागांत समस्या निर्माण झाल्या आहेत.*जवळपास सर्व सेवांवर परिणाम*मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जगभरात बँकांपासून विमान वाहतुकीपर्यंतच्या सेवा ठप्प झाल्या आहेत. अनेक युजर्स याबाबत तक्रार करत आहेत. या समस्येमुळे लाखो युजर्सवर मोठा परिणाम झाला आहे. बरेच युजर्स ही तक्रार करत आहेत की, त्यांची सिस्टम एकतर बंद झाली आहे किंवा त्यांना ब्लू स्क्रीन समस्येचा सामना करावा लागत आहे. मोठ्या बँका, आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या, जीमेल, ॲमेझॉन आणि इतर आपत्कालीन सेवांवरही त्याचा परिणाम होत आहे. अनेक देशांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. मायक्रोसॉफ्टने यावर काम करत असल्याचे म्हटले असून काही सेवा हळू हळू पूर्ववत होत असल्याचे सांगितले आहे.*Microsoft 365 ची ही ॲप्स आणि सेवा वापरण्यात अडचण**OneDrive and OneNote :* अनेक वापरकर्त्यांना त्यांच्या OneDrive आणि OneNote वर संग्रहित केलेल्या फाइल्स संक्रमित करण्यात आणि प्रवेश करण्यात अडचणी आल्या.*Outlook :* काही वापरकर्त्यांना Outlook द्वारे त्यांचे ईमेल ऍक्सेस करण्यात अडथळे आले.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button