
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित 64 मराठी नाट्य स्पर्धा 2025 – 26
स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या रत्नागिरी केंद्रावर आज दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी उद्घाटन पार पडले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीचे कार्यवाह वामन कदम, ज्येष्ठ रंगकर्मी दत्ता बोरकर, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य राजेश गोसावी, तसेच परीक्षकश्री. विजय शिंगणे, प्रा. डॉ. सौ. संगीता टेकाडे, श्री. सुनील जगताप यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन नटराज पूजन दीपप्रज्वलन आणि श्रीफळ अर्पण करून पार पडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक नंदू जुवेकर यांनी केले.
उद्घाटन सोहळ्यानंतर स्पर्धेतील पहिले नाटक दर्यावर्ती प्रतिष्ठान निर्मित अकल्पित सादर झाले.




