रायगड जिल्ह्याच्या माणगाव कुंभे येथील जलविद्युत प्रकल्प परिसरात मोबाईलमध्ये रिल शूट करत असताना मुंबईतील रिलस्टार तरुणीचा तोल जाऊन दरीत पडून मृत्यू
रायगड जिल्ह्याच्या माणगाव कुंभे येथील जलविद्युत प्रकल्प परिसरात फिरायला गेलेल्या युवतीचा धबधब्याजवळ तोल जाऊन मृत्यू झाला आहे. अन्वी संजय कामदार (वय 27, रा. माटुंगा) असे मृत युवतीचे नाव असून, ती रिलस्टार होती.मुंबईच्या माटुंगावरुन युवती आपल्या 6 मित्रांसोबत पावसाळी सहलीसाठी या भागात फिरण्यासाठी आली होती. अन्वी हिला सेल्फीच्या नादात धबधब्याजवळ अपघात झाला, त्यातच ती स्वतःचा जीव गमावून बसली. पावसाळी पर्यटनाचा रायगडमध्ये आतापर्यंतचा हा दहावा बळी आहे.माटुंगा येथून पाच ते सहा जण पावसाळी पर्यटनासाठी रायगडमध्ये आले होते. अन्वी ही माणगाव परीसरात असणाऱ्या कुंभे जलविद्युत परीसरातील एका टेकडीवर रिल बनवत होती, मोबाईलमध्ये रिल शूट करत असताना तिचा तेथून अचानक तोल गेला आणि ती 200 ते 250 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेनंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्वीच्या अकाली निधनाने तिच्या मित्रपरिवारात शोककळा पसरली असून तिच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान, व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेली आणि सोशल मीडियावर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अन्वीला आपला जीव गमवाला लागला आहे. सोशल मीडियातून तिने रील स्टार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती. तिच्या मृत्युमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.