महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार नाही?
गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सातत्याने रंगताना दिसत होत्या. या मंत्रिमंडळ विस्तारासाठी अनेक नेते इच्छुक असल्याची माहितीही समोर आली होती. मात्र या इच्छुक मंत्र्यांच्या इच्छेवर विरजण पडलं आहे. दिल्ली भाजपातील वरिष्ठ नेत्यांकडून एक मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार नाही. महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता कमी आहे. पण येत्या काही दिवसात खाते बदल होण्याची शक्यता मात्र वर्तवली जात आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.