
पर्यटकांसाठी रत्नागिरी ग्राहक पेठतर्फे २३ ते २६ मे दरम्यान प्रदर्शन
रत्नागिरी : गेली १७-१८ वर्षे महिला बचत गट व उद्योगिनींसाठी रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे प्रदर्शन आयोजित केले जाते. यंदा कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि रत्नागिरीकरांसाठी मान्सून पूर्व प्रदर्शन ग्राहक पेठेने येत्या २३ ते २६ मे दरम्यान विशेष प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. टीआरपी येथील अंबर हॉल येथे हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या माध्यमातून महिलांना संधी मिळणार असल्याचे आयोजक प्राची शिंदे यांनी सांगितले.या प्रदर्शनात सहभाग घेण्यासाठी महिला बचत गट, महिला उद्योगिनी यांनी प्राची शिंदे 9422376224 / 9764417079 यांच्याशी संपर्क साधावा आणि १५ मे पूर्वी स्टॉल बुक करावा, असे आवाहन केले आहे.गेली अनेक वर्षे महिला बचत गटांचे संघटन, एकत्रिकरण आणि महिला उद्योगिनींना सर्वतोपरी मदत करणाऱ्या प्राचीताई शिंदे यांनी या या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. सकाळी ११.०० ते रात्रौ ८.३० या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे. या प्रदर्शनात कोकणी मेवा, महिलांची विविध उत्पादने, खाद्यपदार्थ, इन्स्टंट फूड प्रॉडक्टस्, पूजेसाठी धूप, अगरबत्ती, वाती वगैरे पूजेचे उत्तम दर्जाचे साहित्य पर्सेस, आयुर्वेदिक प्रॉडक्टस्, नेल आर्टिस्ट, विविध रांगोळ्या सौंदर्य प्रसाधने, साड्या, कुर्तीज, ज्वेलरी, हॅन्डीक्राफ्ट प्रॉडक्टस्, विविध ड्रेस मटेरिअल्स, गारमेंटस्, दर्जेदार मसाले, व्हेज नॉनव्हेज खाद्य पदार्थ, तसेच चटकदार भेळ, पाणीपुरी, चाट, टेस्टी कोन व स्नॅक्स इत्यादींचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त पर्यटक, रत्नागिरीकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राची शिंदे यांनी केले आहे.