एस.टी.महामंडळाची मालवाहतूक आज पासुन महागली

कोरोनामुळे आर्थिक तोट्यात असलेल्या एस.टी. महामंडळाने उत्पन्नाचा स्रोत म्हणून मालवाहतूक सुरू केली. मात्र, वाढत्या इंधन दरामुळे हे बदल प्रतिकिलोमीटर ३ रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. सोमवार, दि. २० जुलैपासून दरवाढ लागू होत आहे. नवे दर प्रतिकि.मी. ३८ रुपये असतील.
प्रवासी गाड्यांमध्ये काहीसा बदल करून मालवाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे उत्पन्नात काहीशी भर पडली. महामंडळाला इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियमकडून इंधन पुरवठा होतो. महामंडळ हे घाऊक विक्रेते असल्याने त्यांचे दर १५ दिवसांनी बदलले जातात. १ जुलैच्या इंधन दरात फार मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button