खारवी समाज पतसंस्थेची सन २०२३-२४ ची वार्षिक अधिमंडळ बैठक उत्साहात संपन्न

रत्नागिरी: एक पाऊल आर्थिक सक्षमतेकडे हे ब्रीद वाक्य घेऊन आर्थिक क्षेत्रात आघाडी घेऊन काम करणा-या संस्थेची दिनांक १४ जुलै २०२४ रोजी आखिल महाराष्ट्र कष्टकरी खलाशी महासंघ संचलित खारवी समाज भवन हेदवतड, गुहागर येथे मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असताना सुद्धा संपूर्ण जिल्ह्यातून लक्षणीय उपस्थितीत वार्षिक अधिमंडल बैठक संपन्न झाली.सभेची सुरूवात दिपप्रज्वलनाने झाली.गत आर्थिक वर्षीतील लेखाजोखा संस्थेचे कार्यकारी अधिकारी प्रसाद खडपे यांनी मांडला.संस्थेची वर्धिष्णू आर्थिक स्थितीची बलस्थाने,भविष्यातील योजना व सभासदांकडून उत्तम सहभागाची अपेक्षा संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी मार्मिक विश्लेषण केले. या निमित्ताने संस्थेचे नियमितपणे कर्जाचे हप्ते भरणारे सभासद यांचा संस्थेच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला.कर्मचारी यांच्या कामकाजात वृध्दी व्हावी ,त्यासाठी त्यांना अधिक प्रेरणा मिळावी यासाठी पतसंस्थेच्या वतीने आदर्श सेवक म्हणून देवेंद्र कोलथरकर, आदर्श लिपिक म्हणून निखिल आंबेरकर,आदर्श शाखाधिकारी म्हणून सौ.सायली भोसले, आदर्श शाखा म्हणून दाभोळ शाखा,सर्वाधिक ठेव संकलन करणारे पालशेत शाखेचे शाखाधिकारी गणेश ढोर्लेकर तर संस्थेच्या वाटचालीसाठी सुरूवातीपासून उत्कृष्ट आर्थिक उलाढाल करणा-या शृंगारतळी शाखेच्या सर्व टिमचे रोख रक्कम व प्रशस्तीपत्रदेऊन गौरव करण्यात आला.पुरस्कार वितरण सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर वासावे यांनी केले. संस्थेच्या वाटचालीत कौतुकास्पद कामगिरी सर्व कर्मचारी करीत आहेत यांना साथ सहयोग सर्व संचालक, समन्वय समिती पदाधिकारी देत असल्यामुळेच संस्थेची आर्थिक स्थिती मजबूत होऊन गगनभरारी संस्था घेत आहे असे उद्गार संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी काढले.मुसळधार पावसातून जिल्हाभरातून आलेले सभासद यांचेही कौतुक करण्यात आले.सभेचे आभार प्रदर्शन संचालक वासुदेव वाघे यांनी केले तर संपूर्ण सभेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी संचालक दिनेश जाक्कर व रमेश जाक्कर ,समनव्य समिती सदस्य व पालशेत,शृंगारतळी व दाभोळ शाखेच्या कर्मचारी वृन्दानी केले..आपल्या अर्थकारणात व्यावसायिकता आणि सहकारतत्त्व यांची सांगड घालून विस्तारत आहे. सहकारातील सामुहिक ताकद निर्माण करताना नवतंत्रज्ञान, व्यवसाय,संधी याचा कायद्याच्या परिघात राहत अचूक लाभ उठवत ग्राहकांनाही या लाभात सहभागी करून घेणरी पतसंस्था.ग्राहकांचा विश्वास जपत , पतसंस्था अधिक उत्तम अर्थकारण नवनवीन योजना राबवून पार पाडेल असा विश्वास व्यक्त करताना सर्व ठेवीदार, कर्जदार, पिग्मीदार, सभासद, कर्मचारी, अधिकारी, पिग्मी प्रतिनिधी, संचालक, सहकारी, ऑडिटर, वकील, सहकार खात्याचे सर्व अधिकारी यांचा मोलाचा वाटा असून संस्था या सर्वांचीच ऋणी आहे. सर्वांनी दिलेल्या अनमोल सहकार्यामुळे खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेचे अर्थचक्र गतिमान राहिले. त्याबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद दिले. व आगामी वाटचालीमध्ये अशाच पद्धतीने सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button