चार्टमुळं आपला जीव वाचल्याचं खुद्द ट्रम्प यांनी म्हटलंय
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक प्रचार रॅलीदरम्यान गोळीबार झाल्याची घटना रविवारी घडली. यामुळं अवघ्या जगभरात खळबळ उडाली होती. बंदुकीची गोळी केवळ कानाला चाटून गेल्यानं ट्रम्प बचावले.पण ट्रम्प या हल्ल्यातून आश्चर्यकारकरित्या कसे बचावले? याची चर्चा सुरु असताना एका चार्टमुळं आपला जीव वाचल्याचं खुद्द ट्रम्प यांनी म्हटलं आहेविविध माध्यमांतील वृत्तांनुसार, हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं, “शेवटच्या मिलीसेकंदात मी माझं डोकं किंचितसं फिरवलं त्यामुळं बंदुकीतून सुटलेली गोळी माझ्या कानाला चाटून गेली अन्यथा ती डोक्यातून आरपार गेली असती आणि माझा मृत्यू झाला असता” ट्रम्प यांच्या भाषणादरम्यानचा व्हिडिओ देखील समोर आला आहे त्यातून हे स्पष्ट होतं आहे.पण ट्रम्प यांनी डोकं का फिरवलं हे सांगताना ट्रम्प म्हणतात की, “रॅलीच्या ठिकाणी एक मोठी स्क्रीन लावण्यात आली होती. त्यावर अमेरिकेत बेकायदा स्थलांतर केलेल्यांची आकडेवारी फ्लॅश होत होती. या आकडेवारीकडं पाहण्यासाठी त्यांनी आपलं डोकं त्या दिशेनं वळवलं.आकडेवारीच्या या चार्टनंच खरंतर माझा जीव वाचवला, जर मी हा चार्ट पाहण्यासाठी डोकं फिरवलं नसतं तर माझा मृत्यू अटळ होता, असं ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसचे माजी डॉक्टर रॉनी जॅक्सन यांच्याशी बोलताना सांगितलं. तसंच इथं सीमेवर गस्तीवर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी माझे प्राण वाचवले, असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.