
मुंबई-गोवा महामार्गावरील पेढे येथे ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
ट्रेलर चालकाने दुचाकीस्वारास धडक दिल्याची घटना काही दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील पेढे येथे घडली. यात समाधान सिद्धार्थ सावंत (२१, सावर्डे) हा जखमी झाला. या अपघातप्रकरणी ट्रेलर चालकावर चिपळूण पोलीस स्थानकात गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्रिभुवननाथ भोंदलप्रसाद यादव (कर्शना, प्रयागराज-उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद पांडुरंग शिवाजी पाटील यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ९ रोजी सकाळी ११ वाजता त्रिुभवननाथ यादव याने त्याच्या ताब्यातील ट्रेलर हा मुंबई ते गोवा असा राष्ट्रीय महामार्गावरून चालवत होता. यावेळी तो पेढे परिसरात आला असता त्याने ट्रेलर बेदरकारपणे चालवून गोवा बाजूकडून समोरून येणारा दुचाकीस्वार समाधान सावंतला धडक दिली. यात तो जखमी झाला. या अपघातप्रकरणी ट्रेलर चालक यादव याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.www.konkantoday.com