
रत्नागिरीतील नव्या एसटी स्टँडसमाेर एसटीच्या धडकेने पादचाèयाचा उपचाराच्या दरम्याने मृत्यू.
रत्नागिरी शहरातील नव्याने उभ्या राहिलेल्या दिमाखदार एसटी स्टँडमधून आता ग्रामीण व शहरी एसटी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी स्टँडचा परिसर आता प्रवाशांनी गजबजू लागला आहे. मात्र आज या नव्या एसटी स्टँडच्या प्रवेशद्वारातच अपघात झाला. आज दुपारी रस्त्यावरून चालणाèया पादचाèयाला एसटीने प्रवेशद्वारानजिकच ठाेकरल्याने व त्यानंतर ताे चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात नेण्यात आले हाेते. मात्र त्याचा उपचाराच्या दरम्याने मृत्यू झाला. कमलाकर बाबाजी चव्हाण (82) रा. जुवे, असे या मृत्यू पावलेल्या वृद्धाचे नाव आहे. तर बाबू आखाडे हा एसटी चालक ही एसटी घेवून एसटी स्टँडमध्ये जात असताना हा अपघात झाला. या अपघातामुळे माेठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी झाली हाेती.
नव्याने झालेल्या एसटी स्टँडमध्ये आता माेठ्या प्रमाणावर एसटींची वर्दळ सतत हाेणार असून त्यामुळे आजुबाजूला असलेले अनधिकृत खाेके व अडथळे दूर हाेणे गरजेचे आहे. याशिवाय या सर्व एसटी पूर्वीच्या म्हणजे महिला विद्यालयसमाेरील प्रवेशद्वारातून बाहेर पडणार आहेत. त्यामुळे त्या भागातील ेरीवाले व अडथळे दूर करणे तातडीने गरजेचे आहे, अशी नागरिकांची मागणी आहे. याशिवाय रत्नागिरी शहरातील रस्ते अरूंद झाल्याने त्यावरून एसटी गाड्या चालवताना चालक वेगाने एसटी वाहतूक करत असल्याचे अनेक वेळेला दिसून आले आहे. त्यामुळे या एसटी चालकांना देखील शहरातून वाहतूक करताना याेग्य त्या सूचना संबंधित अधिकाèयांनी कराव्यात अशीही मागणी आहे.www.konkantoday.com