दोन गावातील वीजवाहिनी जोडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सारंग व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोपट शिंदे यांनी केली अर्जुना नदी पार

राजापुरातील अर्जुना नदीला आलेल्या पुरात अर्जुना नदीच्या काठावरील शीळ पावसकरवाडी व उन्हाळे मोडेवाडी या दोन गावांना जोडणारी वीजवाहिनी वाहून गेली होती. ही तुटलेली वीजवाहिनी जोडण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील नौका विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सारंग व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोपट शिंदे या दोघांनी अर्जुना नदी पोहून पार करत वीजवाहिन्या पलिकडे नेल्या. त्यांच्या या कामगिरीचे राजापुरातून कौतूक होत आहे.तालुक्यात रविवारी मुसळधार पाऊस कोसळला या पावसामुळे अर्जुना नदीला पूर आल्याने अर्जुना नदीच्या दोन्ही काठावर असलेल्या शीळ, पावसकरवाडी व उन्हाळे मोंडेवाडी या दोन गावांना जोडणारी विद्युतवाहिनी पुराच्या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली होती. त्यामुळे दोन्ही गावातील वीजपुरवठा सुमारे ५ दिवस खंडित होत होता. ही वीजवाहिनी जोडण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन नौका विभागाला मदतीसाठी पाचारण करण्यात आले. यावेळी नौका विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कृष्णा सारंग व त्यांचे सहकारी यांनी दोन्ही गावांची पाहणी केली असता अर्जुना नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे आपत्कालीन बोट अर्जुना नदीत उतरवणे धोक्याचे ठरणार होते. त्यामुळे त्यांनी अर्जुना नदी पोहून पार करण्याचा धाडसी निर्णय घेतला. दोन्ही गावांना जोडणारी विद्युतवाहिनी दोरीला बांधून सारंग व त्यांचे सहकारी शिंदे यांनी अर्जुना नदी पोहून पार करून दोन्ही गावांचा खंडित झालेला विद्युतप्रवाह जोडून देण्यास महत्वाची भूमिका बजावली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button