
शिकाऊ (लर्निंग) लायसन्ससाठी आता परीक्षा घरबसल्या ऑनलाईनही देणे शक्य
शिकाऊ (लर्निंग) लायसन्ससाठी आरटीओत जाऊन परीक्षा द्याावी लागते. मात्र आता ही परीक्षा घरबसल्या ऑनलाईनही देणे शक्य होणार आहे. त्यासाठी आधार जोडणी महत्त्वाची असून कोणतीही अपॉईंटमेंट न घेता फक्त ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पार पाडावी लागेल. ती पूर्ण करुन परीक्षा देणे शक्य होणार आहे. ही नवीन संकल्पना राज्याच्या परिवहन विभागाकडून लवकरच आणली जाणार आहे. त्यामुळे परीक्षेसाठीच्या आरटीओतील खेपा देखील टळणार आहेत. लवकरच या सेवेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com