गर्जे’ल तो पडेल काय? खेला_होबे
” गर्जे’ल तो पडेल काय? #खेला_होबे” अशी पोस्ट सुषमा अंधारे यांनी आपल्या अधिकृत X अकाउंटवरून केली आहे. अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे आणि उमेदवारी देण्यात आली आहे. सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये ‘गर्जे’ल असा शब्द वापरला असल्याने त्यांचा रोख शिवाजीराव गर्जे यांच्याकडेच दिसत आहे.त्यामुळे निवडणुकीत पराभूत होणारा उमेदवार अजित पवार यांच्या गटाचा असणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. विधानपरिषद निवडणुकीत कोणत्याही उमेदवाला विजय मिळवण्यासाठी २३ मतांची गरज आहे. सध्या अजित पवार यांच्याकडे ४० आमदारांची मते असून त्यांच्याकडे ६ मतांची तूट आहे.