
स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावसच्यावतीने दहा लाखांची मदत
स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावसच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी, कोरोना
विषाणूच्या महामारीवर विजय मिळवण्याच्या देशाच्या या लढ्यात यश मिळण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाख व पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीसाठी पाच लाख असा दहा लाखाचा मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे संस्थेचे कार्याध्यक्ष हेमंत(विजय)रघुनाथ देसाई यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी संस्थेचे कार्यवाह ऋषिकेश जयंत पटवर्धन व संस्थेचे
विश्वस्त राजेंद्र केशव जोशी हे उपस्थित
होते.
www.konkantoday.com