
उनाड जनावरांच्या गळ्यात बांधणार चमकणारे पट्टे, माजी सभापती शौकतभाई मुकादम यांचा उपक्रम
महामार्गावर किंवा अंतर्गत रस्त्यावर सध्या रात्रीच्या वेळी उनाड जनावरे फिरत असतात. पावसाळा असल्याने ही जनावरे दुचाकी किंवा चारचाकी वाहनचालकांना लगेच दिसत नाहीत. त्यामुळे अनेक लहान मोठे अपघात होतात. यात काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. या अपघातावर नियंत्रण यावे यासाठी आपण रेडीयमसारखे चमकणारे पट्टे जनावरांच्या गळ्यात बांधणार आहोत. जेणेकरून रात्रीच्या वेळी हा पट्टा चमकून वाहन चालकाला जनावर असल्याचे निदर्शनास येईल व त्यांचा अपघात टळेल. यासाठी आपण हा उपक्रम राबवित असल्याचे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी सांगितले.www.konkantoday.com