
शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू.
राज्यातील बीएड धारक व शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असून शिक्षक (Teacher) भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यासाठी, 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरु होणार आहे.
त्यामुळे, शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांना आणखी संधी आली आहे. झेडपी (ZP) शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांची संख्या पुरेशी आवश्यक असून आगामी काळात सेमी इंग्रजीचे वर्ग देखील या शाळांमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, अनेक जिल्हा परिषदांमधील शिक्षकांच्या रोस्टरबद्दल तक्रारी होत्या. त्यातील अडचणीही दूर झाल्याने आता लवकरच राज्यात शिक्षकांची मोठी भरती होईल.
शिक्षण विभागाने शासनाकडे 14 ते 15 हजार शिक्षकांची भरती करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार, आता शिक्षण विभागाने संबंधित संस्थांकडून जाहिरात मागिवली आहे. त्यामुळे, इच्छुकांना ही नामी संधी आहे.