
रत्नागिरी जिल्ह्यात १ जुलै ते ३१ ऑगस्ट अतिसार थांबवा अभियानातून जनजागृती
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिसाराचे (डायरिया) प्रमाण वाढू नये, म्हणून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी १ जुलैपासून ३१ ऑगस्टपर्यंत अतिसार थांबवा हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये पाणी व स्वच्छता क्षेत्रामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी दिली.केेंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार, अतिसार थांबवा अभियानात जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्यकेंद्रे व सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध होणार्या पाण्याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये दूषित आढळलेले पाणी नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत.जिल्ह्यात सर्व तालुकास्तरावर या अभियानाची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येवून ग्रामपंचायत व इतर शासकीय यंत्रणा, सर्व विभाग या अभियानात सहभाग घेवून नियोजन करण्याबाबत सूचित केले आहे. www.konkantoday.com