
बचत गट, महिला, उदयोन्मुख उद्योगिनींसाठी रत्नागिरी ग्राहक पेठतर्फे दिवाळीनिमित्त भव्य प्रदर्शन
रत्नागिरी : रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे दिवाळीपूर्व भव्य प्रदर्शन प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी आयोजित केले आहे. बचत गट, महिला, उदयोन्मुख उद्योगिनींसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. येत्या ३ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत टीआरपी, गणेश कॉलनी येथील अंबर मंगल कार्यालयात या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यामध्ये स्टॉल बुकिंगसाठी आवाहन केले आहे. महिलांनी स्टॉल बुक करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रत्नागिरी ग्राहक पेठेमार्फत गेली अनेक वर्षे हे प्रदर्शन भरवण्यात येते व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभतो. महिला बचत गटातील महिला व इतर उदयोन्मुख उद्योजिका महिलांना व्यवसायाची सुवर्णसंधी आणि दिवाळीच्या पूर्वतयारीसाठी ग्राहकांना विविध आकर्षक वस्तू एकाच छताखाली मिळणार आहेत. या वर्षी दिवाळीचा आनंद द्विगुणित करता येईल. अतिशय रुचकर, उत्तम क्वालिटीच्या दिवाळीच्या फराळाची ऑर्डर देता येईल. दिवाळीच्या पणत्या, इतर सजावटीचे साहित्य वगैरे सर्वकाही एकाच छताखाली मिळणार आहे. स्टॉल बुकिंगसाठी प्राची शिंदे 9422376224 किंवा 9764417079 या क्रमांकावर त्वरीत संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.
www.konkantoday.com