पेडणे बोगद्यात पाणी भरल्याने कोकण रेल्वे थांबली ,कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या रद्द तर काहींचे मार्ग बदलले
कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे बोगद्यात काल रात्री पाणी भरले होते त्यानंतर ते ओसरल्यानंतर एक गाडी रवाना झाली होती परंतु आज पहाटे 10जुलै 24रोजी कोकण रेल्वेच्या पेडणे बोगाद्या मध्ये पुन्हा पाणी भरल्याने येथील वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे.यामुळे मुंबई तून रवाना होणाऱ्या काही ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत तर काही ट्रेन्स चे मार्ग बदलण्यात येत आहेत.अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई, यांनी दिली आहे.
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या
वंदे भारत एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, मांडवी एक्स्प्रेस, सावंतवाडी पॅसेंजर, तेजस एक्सप्रेस, दिवा एक्सप्रेस आणि मंगळुरू एक्सप्रेस या रद्द करण्यात आल्या आहेत तर मंगला एक्सप्रेसचा मार्ग बदलून तो पनवेल- लोणावळा – पुणे -मिरज- लोंढा -मडगाव असा करण्यात आला आहे. गेले काही दिवस मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते त्यामुळे गाड्या उशिरा धावत होत्या