
बारावा उमेदवार देण्याची गरज नव्हती-काँग्रेस नेते, आमदार विश्वजीत कदम
विधानपरिषद निवडणुकीसाठी येत्या 12 जुलै रोजी निवडणूक पार पडत आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र बारावा उमेदवार देण्याची गरज नव्हती, असं म्हणज काँग्रेस नेते, आमदार विश्वजीत कदम यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे.विश्वजीत कदम यांनी म्हटलं की, बारावा उमेदवार देण्याची गरज होती असं वाटतं नाही. 11 उमेदवार असते तर आता बिनविरोध ही निवडणूक झाली असती, जे बरं झालं असतं. पण आता तो निर्णय वरिष्ठांनी घेतला आहे, त्यामुळे बोलून काही होणार नाही. आम्हाला खात्री आहे आमचे सर्व उमेदवार निवडून येतील. आमच्याकडे आमची मते, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाची मते आहेत. त्यामुळे आमचे उमेदवार निवडून येतील. मात्र तरीही ज्यादा उमेदवार देण्याची गरज खरं तर नव्हती, अशी भूमिका विश्वजीत कदम यांनी मांडली आहे.