
गणपतीपुळे येथील मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त चार हजार भाविकांनी घेतले गणेशाचे दर्शन
गणपतीपुळे येथील मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त बुधवारी (ता. २) भक्तांनी हजेरी लावली. दिवसभरामध्ये सुमारे ४ हजार जणांची दर्शनासाठी नोंद झाल्याचे मंदिर प्रशासनाकडुन सांगण्यात आले.मराठा आंदोलनामुळे पश्चिम महाराष्ट्रातील एसटी फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे दर्शनासाठी परजिल्ह्यातून येणाऱ्यांचे प्रमाण कमी होते.
संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरातील श्रींच्या मुर्तीची सजावट करण्यात आली होती . पहाटे पाच वाजता नियमित पुजा झाल्यानंतर भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. त्यानंतर दिवसभर भक्तगण मंदिरात दर्शनासाठी येत होते. संकष्टीला दिवसभरात मोठ्याप्रमाणात गर्दी होते. परंतु गेले काही दिवस मराठा आंदोलन सुरु असल्यामुळे काही ठिकाणच्या एसटी फेऱ्या बंद केल्या होत्या त्याचा परिणाम झाला
www.konkantoday.com