नवनिर्वाचित खासदार माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते त्यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज झाले.यावेळी माजी खासदार निलेश राणे, भाजपा ज्येष्ठ नेते सतीश शेवडे, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, तालुकाध्यक्ष दादा दळी, विबेक सुर्वे, शहराध्यक्ष फाळके, महिला जिल्हाध्यक्षा सुजाता साळवी, सौ रश्मी कदम, ऐश्वर्या जठार यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हे कार्यालय रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर येथे असून हे सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचे मुख्य केंद्र असेल अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली.