चिपळूण शहरातील पाण्याच्या मुख्य पाईपलाईनची दुरूस्ती पूर्ण

गोवळकोटसह अर्ध्या शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य पाईपलाईनला गोवळकोट परिसरात लागलेल्या गळतीच्या दुरूस्तीचे काम मंगळवारी पूर्ण झाले आहे. त्यामुळे १० जुलैपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.गोवळकोट येथील जॅकवेलमधून गोवळकोट, गोवळकोटरोड, पेठमाप, मुरादपूर, उक्ताड अशा अर्ध्या शहराला पाणीपुरवठा केला जातो. यासाठी असलेल्या १२ इंचाच्या मुख्य पाईपलाईनला गोवळकोट मगरींचा पॉईंट परिसरात गळती लागली. हा प्रकार न.प. कर्मचार्‍यांच्या सोमवारी सकाळी लक्षात आला. मात्र ही मुख्य पाईपलाईन पर्‍यातून असल्याने व पावसामुळे पर्‍याला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने सोमवारी दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले नाही. मात्र २ दिवस पावसाचा जोर कमी झाल्याने पर्‍याच्या पाणीपातळीतही घट झाली. त्यामुळे मंगळवारी या पाईपलाईनची दुरूस्ती पूर्ण झाली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button