
अखेर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात यश
कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे बोगद्यात पाणी भरल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती यामुळे काही गाड्या अडकून पडल्या होत्या तर काही गाड्या रद्द कराव्या लागल्या होत्या पेडणे बोगद्यात जमिनी खालून पाणी येत असल्याने बोगद्यात पाणी पसरले होते त्यामुळे वाहतूक बंद करावी लागली होती येणारे हे पाणी थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू होते कालपासून कोकण रेल्वेचे 100 कर्मचारी 25 सुपरवायझर अन्य वरिष्ठ अधिकारी वर्ग सकाळपासून सायंकाळपर्यंत युद्ध पातळीवर काम करीत होता अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे कोकण रेल्वेच्या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात यश आले आहे.18:35वाजता पेडणे बोगद्यातून पहिली ट्रेन रवाना करण्यात आली आहे अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली आहे
www.konkantoday.com