वसंत मोरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी दिली त्यांना वेगळी शिक्षा

लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेतून वंचित गटात गेलेल्या वसंत मोरेंनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर वसंत मोरेंचा पक्षप्रवेश पार पडला.यावेळी वसंत मोरेंनी शिवबंधन बांधत हाती मशाल घेतली. वसंत मोरेंच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवसेना सोडल्याबद्दल एक शिक्षा दिली.वसंत मोरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वसंत मोरेंसह शिवसेनेत प्रवेश घेतलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यावेळी त्यांनी वसंत मोरेंवर काय जबाबदारी असणार, याचीही माहिती दिली.वसंत मोरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वसंत मोरेंसह शिवसेनेत प्रवेश घेतलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यावेळी त्यांनी वसंत मोरेंवर काय जबाबदारी असणार, याचीही माहिती दिली.वसंत मोरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वसंत मोरेंसह शिवसेनेत प्रवेश घेतलेल्या असंख्य कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यावेळी त्यांनी वसंत मोरेंवर काय जबाबदारी असणार, याचीही माहिती दिली.वसंत मोरेंसह आपल्या स्वगृही परतलेल्या सर्व बांधवांनो आणि भगिनींनो लोकसभेआधी आम्ही सर्वजण बघत होतो, वसंतराव काय करतात हे बघत होतो. काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण एका गोष्टीचं मला नक्कीच समाधान आहे की तुम्ही पहिले शिवसैनिक होतात. मधल्या काळात शिवसेनेच्या बाहेर पक्षात काय वागणूक मिळते, काय सन्मान मिळतो, याचा अनुभव घेतला आणि तो अनुभव घेऊन तुम्ही अधिक परिपक्व होऊन स्वगृही परतला आहात. त्यामुळे आज तुमचं महत्त्व, काम आणि जबाबदारी फार मोठी आहे. मी शिवबंधन बांधत असताना काहींनी मला आम्हीही शिवसैनिक होतो, असं सांगितलं.मग आता तुम्हाला शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा ही झालीच पाहिजे. ती वसंत मोरेंनाही व्हायला पाहिजे. मी तुम्हाला देतोय ती शिक्षा हीच आहे की पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मला पुण्यात शिवसेना वाढवून हवी आहे. ती वाढवण्याची जबाबदारी मी वसंत मोरेंना देतोय. शिक्षा हा गंमतीशीर शब्द आहे तो तशा पद्धतीने घेऊ नका. पण ही जबाबदारी म्हणून घ्या.लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने देशाला एक दिशा दाखवली आहे. ती लढाई लोकशाही, संविधान वाचवण्याची होती. आता जी लढाई होईल, ती गद्दारी धोकेबाजी आणि लाचारीच्या विरुद्धची होणार आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वाची ती लढाई असणार आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.आज वसंत मोरेंसोबत मनसेचे १७ शाखाअध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष, १ शहराध्यक्ष, पर्यावरण सेनेचे अनेक पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी, माथाडीचे पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यामुळे पुण्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button