मुंबई पोलिसांच्या श्वान पथकातील “डिझेल ” बरोबर रमले पालकमंत्री उदय सामंत
काल रात्री उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत हे “कोकण कन्या” रेल्वे ने रत्नागिरीला जात असताना मुंबई पोलिसांच्या श्वान पथकातील “डिझेल ” ची भेट छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनलां झाली. अतिशय प्रेमळ आणि कामात पटाईत असल्याने या श्वानांमुळे गुन्हे थांबण्यास मदत झाली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या वायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये पालकमंत्री उदय सामंत हे प्राण्यांवर किती प्रेम करता हे पाहायला मिळाले. पालकमंत्री उदय सामंत यांना डिझेलने उत्तम प्रतिसाद दिला आणि त्यामध्ये पालकमंत्री रमुन गेले.”प्राण्यांना आपण जेवढं प्रेम द्याल तेवढच प्रेम हे प्राणी माणसांना देत ” त्याचं मूर्तीमंत उदाहरण आज पुन्हा अनुभवायला मिळालं.