अखेर हिंदू समाज मोर्चाचा विजय, गोवंशाची हत्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर
मिरजोळे एमआयडीसी येथील गोवंशाची हत्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीला पोलिसांनी हिंदू समाजाच्या मागणीनंतर तत्काळ न्यायालयात हजर केल्यानंतर तब्बल दोन तासांनी शहरातील मुख्य मार्गावरील रस्ता रोको मागे घेण्यात आला.आपल्या मागणीवर शेवटपर्यंत ठाम राहिल्याने अखेर हिंदू समाजाच्या आंदोलनाला यश आले.मारुती मंदिर हून निघालेल्या जाब विचारू आंदोलन पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ आल्यानंतर तिथेच जमाव अडवण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक यानीच समोर येऊन उत्तर दिले पाहिजे या मागणीला पोलिसांनी प्रतिसाद दिला.मात्र एसपी धनंजय कुलकर्णी यांनी दिलेल्या उत्तरावर आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही. यावेळी निलेश राणे यांनी या प्रकरणी एसआयटी स्थापन करुन आमच्यासमोर आरोपीला न्यायालयात नेऊन हजर करा ही मागणी केली. अखेर जेल नाका येथील शहरातील मुख्य रस्ता रोखून ठेवण्यात .हजारो हिंदू बांधव यांच्यासह निलेश राणे हेही रस्त्यावर बसले. यावेळी माजी आमदार बाळ माने, सचिन वाहाळक, उमेश कुलकर्णी यांच्यासह अनेक पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.तब्बल दोन तास हिंदू आंदोलक रस्त्यावर ठिय्या मांडून होते. हिंदू समाजाच्या निर्धारासमोर अखेर पोलिसांनीही माघार घेत अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात नेऊन तीन दिवसांची पोलिस कोठडी मागितली. याची माहिती आंदोलनकर्त्यांना मिळाल्यानंतर अखेर सर्वत्र जयघोष करण्यात आला.