माझी लाडकी बहिण या योजनेसाठी तयार करण्यात आलेले नारी शक्ती दूत ऍप दोन दिवसात सुरू होणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने तयार केलेला नारी शक्ती दूत ऍप येत्या २ दिवसात सुरू होणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना यावर ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. अंगणवाड्यांसह अन्य ठिकाणीही अर्ज करण्याची सुविधा राहणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र अर्ज कोठेही भरले तरी ऑफलाईन अर्ज अंगणवाड्यांमध्येच जमा करावे लागणार आहेत. या योजनेची सेविकांना अधिकार्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.www.konkantoday.com