
रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी घेतली कोकण रेल्वेच्या संचालकांची भेट
कोकण रेल्वेचे नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांना भेटून कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी त्यांचे अभिनंदन करून तालुक्यातील रेल्वेच्या विविध समस्यांविषयी चर्चा केली.चिपळूण येथे सीसीटीव्ही बसविणे, अद्ययावत वेटींग रूम, प्रलंबित असलेला रेल्वे डबल ट्रॅक, वंदे भारतला थांबा व चिपळूण-दादर पॅसेंजर रेल्वे सुरू करणे, कळंबस्ते पूल, चिपळूण-कराड रेल्वे मार्गाबाबत पाठपुरावा करणे, अशा विविध विषयांवर तसेच प्रलंबित प्रश्नांवर चर्चेत विशेष भर देण्यात आल्याचे श्री. मुकादम यांनी स्पष्ट केले. या वेळी कळंबस्तेचे उपसरपंच गजानन महाडीक, ग्रा.पं. सदस्य दशरथ जाधव उपस्थित होते.www.konkantoday.com