टेस्टिंग केंद्रावर लक्षणानुसार काेणती टेस्ट करायचे अधिकार वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना ,प्रशासनाचे आदेश

दिनांक १८एप्रिल रोजीपासून शिर्के हायस्कूल, रत्नागिरी येथे कोविड-19 तपासणी केंद्र (Testing Center) सुरू करण्यात आले असून त्याठिकाणी RTPCR व RAT अशा दोनही प्रकारच्या तपासण्या करण्यात येत आहेत. दि १८व १९ असे दोन दिवस सदर तपासणी केंद्रावर एकूण ६१० व्यक्तींच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत.
मा. जिल्हाधिकारी महोदय यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे लक्षणे दिसून येत नसलेल्या RAT तपासणी करण्यात येईल. Symptomatic अथवा तीव्र लक्षणे असलेल्या व्यक्तींची RAT / RTPCR जसे तपासणी केंद्रावरील डॉक्टर अथवा आरोग्य कर्मचारी ठरवतील त्याअनुषंगाने तपासणी करण्यात येईल. कृपया कोणीही RTPCR तपासणीसाठी तगादा लावू नये.
कोणत्याही संस्थेने कर्मचाऱ्यांच्या/कामगारांच्या RTPCR तपासणीची अट ठेवू नये. सदर तपासणीच्या निष्कर्षांबाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी शिर्के हायस्कूल येथे स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला असून त्याठिकाणी सदर तपासणीबाबतचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
व्यापाऱ्यांच्या कोविड-19 तपासणीसाठी फिरते तपासणी पथक निर्माण करण्यात येत असून व्यापाऱ्यांनी अथवा त्यांचे अधिनस्त कामगारांनी सदर फिरत्या तपासणी पथकामार्फत तपासणी करून घ्यावी. सदर तपासणीचे प्रमाणपत्र त्याच ठिकाणी देण्याबाबत व्यवस्था करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button