रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने जिल्हा परिषद, रत्नागिरीचे शाळांकरीता संगणक संच वितरण!

रत्नागिरी जिल्हा परिषद, रत्नागिरीच्या शाळांमधील विद्याथ्यांना संगणक विषयाचे अद्यावत ज्ञान आवश्यक असलेने जिल्हा परिषद शाळांकरीता विंडोज ऑपरेटींग सिस्टीमसहीत संगणक संच उपलब्ध करून मिळावेत म्हणून जिल्हा परिषद, रत्नागिरी यांचेकडून बँकेकडे मागणी करणेत आली होती. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी असतात, अशा विद्यार्थ्यांना स्वखर्चाने संगणक संच घेणे शक्य नसल्याने, विद्यार्थ्यांची गरज तसेच संगणकाचा त्यांना भविष्यकाळात होणारा उपयोग या बाबी विचारांत घेऊन, जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे १०० संगणक संच देणेचे आश्वासन देणेत आले होते. त्यानुसार जिल्हा परिषद शाळांकरीता २ टप्यांत संगणक संच देणेचा निर्णय बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दि.२१.१२.२०२३ रोजीचे संचालक मंडळ सभेमध्ये घेणेत आला. त्यानुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात ५० संगणक संच, बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे व उपाध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव, बँकेचे सर्व संचालक मंडळ सदस्य, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजय चव्हाण, सरव्यवस्थापक डॉ. सुधीर गिम्हवणेकर यांचे उपस्थितीत बँकेच्या संचालक मंडळ सभेचे औचित्य साधुन दि.२९.०२.२०२४ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखाधिकारी श्री. हनुमंत सुर्वे व उपमुख्य लेखाधिकारी श्री. संजय कांबळे यांचेकडे सुपूर्द करणेत आले. तसेच उर्वरित ५० संगणक संच सन २०२४- २५ या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला सुपूर्द करणेत येणार आहेत.Wwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button